Sameer Amunekar
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंड क्रिकेट संघानं खूपच खराब कामगिरी केली. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 351 धावा केल्यानंतर संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
यानंतर, इंग्लंड संघाला अफगाणिस्तानविरुद्ध 8 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सलग दोन पराभवांनंतर इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला.
कर्णधार जॉस बटलरची कामगिरीही त्याच्या नावाप्रमाणे झाली नाही. परिणामी बटलरनं इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या कर्णधारपदाला रामराम ठोकला.
जॉस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ 2023 च्या वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही. यानंतर, 2024 च्या टी-20 विश्वचषकातही संघाची कामगिरी चांगली नव्हती.
जॉस बटलरच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्यानंतर आता इंग्लंज संघाचा नवा कर्णधार कोण होणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
सध्या इंग्लंड संघाचा उपकर्णधार असलेला हॅरी ब्रूक कर्णधारपदासाठी एक प्रबळ दावेदार मानला जातोय.