Manish Jadhav
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे.
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना जोस बटलरने इंग्लंडसाठी एक शानदार अर्धशतक झळकावले. परंतु इतर फलंदाजांना लय सापडली नाही.
जोस बटलरने 68 धावांची खेळी खेळली, ज्यात 8 चौकार आणि दोन षटकार लगावले.
सामन्यात 33 धावा करत बटलरने टी-20 क्रिकेटमध्ये 12000 धावा पूर्ण केल्या. तो टी-20 क्रिकेटमध्ये 12,000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा एकूण 7वा फलंदाज ठरला.
टी-20 क्रिकेटमध्ये 12000 धावा पूर्ण करणारा बटलर इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला. त्याच्या आधी अॅलेक्स हेल्सने अशी कामगिरी केली आहे.
आतापर्यंत त्याने 430 टी-20 सामन्यांमध्ये एकूण 12035 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 8 शतके आणि 84 अर्धशतके त्याच्या बॅटमधून आली आहेत.