Manish Jadhav
भारताचा स्टार युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी एक मोठा रेकॉर्ड नोंदवला आहे.
कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात अर्शदीपने टीम इंडियाला दमदार सुरुवात करुन दिली.
अर्शदीपने पहिल्या 2 षटकांत 2 बळी घेत इंग्लंडला बॅकफूटवर आणले. दरम्यान, त्याने या दोन विकेट्सह टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला.
अर्शदीप सिंगने नोव्हेंबर 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अवघ्या 2 वर्षात त्याने टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला.
अर्शदीपने सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत युजवेंद्र चहलशी बरोबरी केली होती. परंतु पुढच्याच षटकात बेन डकेटला आऊट करत त्याने हा रेकॉर्ड केला.
अर्शदीप सिंगने 61 सामन्यांमध्ये 97 विकेट्सचा आकडा गाठला आहे. त्याने 17.90 च्या सरासरीने आणि 9 पेक्षा कमी इकॉनॉमीने या विकेट्स घेतल्या आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात अर्शदीप सिंगचाही समावेश आहे.