गोमन्तक डिजिटल टीम
जॉन सील यांच्या मास्टर क्लास इफ्फीमध्ये झाला.
त्यांना ऐकण्यासाठी पूर्ण सभागृह भरून गेले होते.
सिनेमॅटोग्राफर हा तंत्रज्ञ नाही तर तो एक कलाकार असतो. तो दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनाला चित्रपटात उतरवण्याचे काम करतो असे सिनेमॅटोग्राफर सील यांनी सांगितले.
मास्टर क्लासमध्ये सिनेमॅटोग्राफीच्या जगातील खास रहस्ये जॉन सील यांनी उघड केली.
त्यांच्या वर्षानुवर्षेच्या अनुभवातून मिळालेली माहिती आणि अंतर्दृष्टी या मास्टर क्लासमध्ये उपस्थित असलेल्या सर्व कलाकारांसाठी खूप उपयुक्त ठरली.
सील यांनी अभिनेत्यांच्या भूमिकेवरही भर दिला. ते म्हणाले, एक चांगला सिनेमॅटोग्राफर अभिनेत्यांना त्यांच्या भूमिकेत अधिक सहज व्हायला मदत करतो.
प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गडगडाटात सील यांचे स्वागत केले.