Jog Falls: 'राजा-राणी'चा अनोखा आणि निसर्गरम्य संगम, 830 फुटांवरुन कोसळणारा जोग धबधबा; पावसाळी पर्यटनाचा 'राजा'

Manish Jadhav

जोग धबधबा

कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यात असलेला जोग धबधबा हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच (थेट कोसळणारा) धबधबा आहे. पावसाळ्यात तब्बल 830 फूट उंचीवरुन कोसळणारे याचे पाणी पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.

Jog Falls | Dainik Gomantak

'राजा-राणी'चा अनोखा संगम!

हा धबधबा शरावती नदीमुळे तयार होतो आणि तो मुख्यत्वे चार वेगवेगळ्या प्रवाहांचा संगम आहे, ज्यांना अतिशय सुंदर नावे देण्यात आली आहेत: राजा (Raja), रोअरर (Roarer), रॉकेट आणि राणी

Jog Falls | Dainik Gomantak

भेट देण्याचा सर्वोत्तम काळ!

उन्हाळ्यात हा धबधबा संथ असतो, पण जून ते सप्टेंबर या पावसाळी महिन्यांत तो पूर्ण ओसंडून वाहतो. चारी बाजूंनी कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी आणि आजूबाजूला पसरलेली दाट धुक्याची चादर पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.

Jog Falls | Dainik Gomantak

1400 पायऱ्यांचा थरारक प्रवास!

धबधब्याचे सौंदर्य खालून जवळून अनुभवण्यासाठी पर्यटकांना तब्बल 1400 हून अधिक पायऱ्या उतरुन खाली दरीत जावे लागते. हा ट्रेकिंगचा अनुभव अत्यंत थरारक आणि निसर्गप्रेमींसाठी पर्वणी ठरतो.

Jog Falls | Dainik Gomantak

वॅटकिन्स प्लॅटफॉर्मवरुन विहंगम दृश्य!

तुम्हाला जर जास्त पायऱ्या उतरायच्या नसतील, तर 'वॅटकिन्स प्लॅटफॉर्म' (Watkins Platform) वरुन जोग धबधब्याचा सर्वात उत्कृष्ट आणि विहंगम व्ह्यू मिळतो. इथे फोटोग्राफीसाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.

Jog Falls | Dainik Gomantak

रात्री लेझर शो!

पावसाळी पर्यटनाला अधिक रंजक बनवण्यासाठी प्रशासनातर्फे येथे रात्रीच्या वेळी स्पेशल लेझर शो आणि संगीतमय कारंज्यांचे आयोजन केले जाते. रात्रीच्या प्रकाशात चमकणारा धबधबा थक्क करणारा दिसतो.

Jog Falls | Dainik Gomantak

कसं पोहोचायचं?

जवळचे विमानतळ: हुबळी आणि बंगळुरु

जवळचे रेल्वे स्टेशन: सागर (Sagara - 28 किमी) किंवा शिमोगा (Shimoga). गोवा आणि महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग/कोल्हापूर भागातूनही रस्ते मार्गाने इथे सहज पोहोचता येते.

Jog Falls | Dainik Gomantak

Devkund Waterfall: तीन नद्यांचा संगम अन् 300 फुटांवरुन कोसळणारं पाणी, सह्याद्रीच्या कुशीतील छुपा खजिना 'देवकुंड' धबधबा; इथे देव स्नान करायला यायचे

आणखी बघा