Manish Jadhav
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात जो रुटने भारतीय गोलंदाजांची (Indian Bowlers) धुलाई करत आणखी एक दमदार शतक झळकावले.
जो रुटचे इंग्लंडच्या भूमीवरील हे 23वे कसोटी शतक आहे. यासोबतच, मायदेशात सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर पोहोचला.
घरच्या मैदानावर 23 शतके झळकावत त्याने महेला जयवर्धने, जॅक कॅलिस आणि रिकी पॉन्टिंग या महान फलंदाजांशी बरोबरी केली.
सचिन तेंडुलकरने भारतात 22 कसोटी शतके लगावली होती. आता जो रुटने मायदेशात सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत दिग्गज सचिन तेंडुलकरलाही मागे सोडले.
जो रुटचे या कसोटी मालिकेत हे सलग दुसरे शतक आहे. लॉर्ड्स कसोटीत शतक झळकावल्यानंतर त्याने मँचेस्टरमध्येही 100 धावांचा टप्पा पार केला.
भारतासोबतच्या पहिल्या कसोटीत रुटने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. दुसऱ्या कसोटीत तो अपयशी ठरला, पण तिसऱ्या कसोटीत त्याने 104 धावांचे उत्कृष्ट शतक झळकावले.
चौथ्या कसोटीतही त्याने शतक झळकावत इंग्लंडला मजबूत स्थितीत पोहोचवले.
या शतकामुळे जो रुटने कसोटी क्रिकेटमधील आपला दर्जा आणि महत्त्व पुन्हा एकदा सिद्ध केले. तो सातत्याने धावा करत असून, इंग्लंडसाठी तो एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे.