Manish Jadhav
कोकण किनारपट्टीवरील मालवणजवळ (Malvan) अरबी समुद्रात वसलेला सिंधुदुर्ग किल्ला (Sindhudurg Fort) हा मराठा साम्राज्याच्या अजोड सागरी सामर्थ्याचे आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहे.
1660 च्या दशकात समुद्रातून होणारे हल्ले रोखण्यासाठी आणि आपल्या आरमाराला (Navy) सुरक्षित तळ उपलब्ध करुन देण्यासाठी शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची गरज ओळखली होती. 12 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हा किल्ला पूर्ण झाला होता.
हा किल्ला कुरटे नावाच्या लहान बेटावर बांधण्यात आला. समुद्राच्या मधोमध असल्याने तो शत्रूंसाठी सहज जिंकणे अशक्य होते.
किल्ल्याच्या बांधकामात सुमारे 4000 मण शिशाचा (Lead) वापर करण्यात आला होता, ज्यामुळे समुद्राच्या लाटांचा मारा सहन करण्याची त्याची क्षमता वाढली.
छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या किल्ल्यात काही काळ राहिले होते. किल्ल्यावर आजही त्यांच्या हाताचे आणि पावलांचे ठसे (Footprints) जतन केलेले आहेत.
समुद्राच्या मध्यभागी असूनही किल्ल्याच्या आत गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत.
किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार समुद्रातून सहजासहजी दिसत नाही, ते अशा पद्धतीने बांधले आहे की शत्रूंना ते शोधणे कठीण होई. याला 'गोमुखी रचना' असेही म्हटले जाते.
किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे एक छोटे मंदिर आहे, जे जगातील एकमेव शिवाजी महाराजांचे मंदिर मानले जाते.