Manish Jadhav
इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटने कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक मोठी कामगिरी केली. घरच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे सोडले.
ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रुटला सचिनला मागे टाकण्यासाठी फक्त 22 धावांची गरज होती. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर चौकार मारुन त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला.
जो रुट: 7229* धावा (84 कसोटी)
सचिन तेंडुलकर: 7216 धावा (94 कसोटी)
या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 92 कसोटी सामन्यांत 7258 धावा केल्या आहेत. रुट आता पाँटिंगला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहोचण्यापासून केवळ 30 धावा दूर आहे.
जो रुट हा इंग्लंडचा पहिला आणि जागतिक क्रिकेटमधील पहिला फलंदाज आहे, ज्याने घरच्या मैदानावर भारताच्या विरुद्ध 2000 हून अधिक कसोटी धावा केल्या आहेत.
जागतिक क्रिकेटमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध घरच्या मैदानावर 2000 हून अधिक धावा करणारा रुट हा दुसरा फलंदाज आहे.
यापूर्वी, हा विक्रम फक्त सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर होता, ज्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये इंग्लंडविरुद्ध 2354 धावा केल्या होत्या.
ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात जर रुटने 30 धावा केल्या तर तो रिकी पाँटिंगला मागे टाकून घरच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरेल.