Manish Jadhav
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर सुरु असून इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुटने या सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
दुसऱ्या डावात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 8000 धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरला.
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रुटने जबरदस्त फलंदाजी करत 104 धावांची शतकी खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळेच इंग्लंड संघाने 387 धावांपर्यंत मजल मारली.
आता दुसऱ्या डावात फलंदाजी करताना रुटने महत्त्वपूर्ण 40 धावा केल्या.
या 40 धावांच्या जोरावर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये नंबर-4 या स्थानावर खेळताना 8000 धावा पूर्ण करण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला.
कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 8000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा रुट चौथा फलंदाज ठरला.
रुट आता सचिन तेंडुलकर, महेला जयवर्धने, जॅक कॅलिस या दिग्गज फलंदाजांच्या क्लबमध्ये सामील झाला.
रुटची ही विक्रमी कामगिरी सातत्यपूर्ण फलंदाजी आणि कसोटी क्रिकेटमधील त्याच्या महानतेची साक्ष देते.