Manish Jadhav
अळशीच्या बिया दिसायला लहान असल्या तरी त्या आरोग्यासाठी लय फायदेशीर आहेत.
अळशीच्या बिया ओमेगा-3 फॅटी ॲसिड, फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्स या पोषक तत्वांनी परिपूर्ण आहेत.
अळशीच्या बियांचे पाण्यात भिजवून सेवन केल्यास त्याचे पोषक घटक शरीराला मिळतात आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
सकाळी रिकाम्या पोटी अळशीचे पाणी प्यायल्यास चयापचय क्रिया सुधारते, ज्यामुळे जलद गतीने फॅट्स बर्न होतात.
अळशीतील विद्राव्य आणि अविद्राव्य फायबर पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
अळशीमधील ओमेगा-3 फॅटी ॲसिड त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
अळशीतील फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
अळशीतील ओमेगा-3 फॅटी ॲसिड हृदयाच्या आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे.