Sameer Amunekar
तुम्हाला प्रमोशन मिळालं, परीक्षा चांगली झाली, किंवा एखादी गोष्ट साध्य केली तर हे मित्र 'वा!' म्हणण्याऐवजी विषय टाळतात किंवा तिरकस बोलतात.
ते कायम तुमच्याशी तुलना करत असतात. "तू हे केलं, पण मी तर त्यापेक्षा भारीच..." अशी वागणूक देतात.
तुमचं एखादं नवं काम, कपडे, रिलेशनशिप – काहीही असो, ते त्यावर लगेच नकारात्मक कमेंट देतात.
तुम्ही खुश असताना, आनंद साजरा करताना हे मित्र कुठलं तरी दु:खी कारण सांगून किंवा वाईट गोष्ट आठवून देऊन तुमचा मूड ऑफ करतात.
समोर छान बोलतात, पण तुमच्या गैरहजेरीत इतरांना तुमच्याबद्दल वाईट बोलतात. यामुळे कधीकधी इतरांकडून कळतं की, "तुझ्या विषयी अमुक अमुक म्हणालाय".
तुम्ही नवीन काही करण्याचा विचार करत असाल, तर ते नेहमी भीती दाखवून, त्रुटी दाखवून तुमचं मन खचवतात.