Sameer Amunekar
एखाद्या जवळच्या मित्राशी/मैत्रिणीशी बोला, डायरी लिहा किंवा एकट्याने थोडं रडून घ्या – मन हलकं करणं गरजेचं आहे.
मनाला भिडणारं, शांत करणारा संगीत तुमचा मूड लगेच बदलू शकतं. खासकरून ते गाणं ऐका जे तुमच्यात ऊर्जा भरतं.
सततच्या अपडेट्स आणि नकारात्मक गोष्टी मनावर परिणाम करतात. काही वेळ स्वतःसाठी घ्या – निसर्गात फिरा, छंद जोपासा.
फिजिकल अॅक्टिव्हिटीमुळे ‘हॅपी हार्मोन्स’ (dopamine, serotonin) तयार होतात. त्यामुळे मन हलकं आणि प्रसन्न वाटतं.
‘हे माझ्यामुळेच झालं’, ‘मीच चुकलो’ असं म्हणणं टाळा. चुकलं तरी हरकत नाही – चुका हे शिकण्याचं साधन असतं.
चहा-कॉफी, लाडका पदार्थ, एखादी वेबसीरिज किंवा झोप – जे तुमचं मन भरतं ते करा. स्वतःशी प्रेमाने वागणं हीच खरी जादू आहे.