Sameer Amunekar
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रानं लग्न केलं आहे. त्यानं लग्न केल्याची माहिती त्याच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिलीय.
नीरजने सोशल मिडियावर पोस्ट करत लिहिलं की, मी माझ्या जीवनाचा नवा अध्याय माझ्या कुटुंबासोबत सुरू करत आहे. तसंच त्याने लाल रंगाचा हार्ट इमोजी टाकून नीरज आणि हिमानी असं लिहिलं आहे.
नीरज चोप्राच्या पत्नीचं नाव हिमानी मोर असे आहे. हिमानी सध्या अमेरिकेत शिक्षण घेत आहे. जवळच्या नातेवाईकांत नीरज आणि हिमानी यांच्या विवाह पार पडला.
हिमानी ही टेनिस खेळाडू आहे. तिनं साउथ ईस्टर्न लुइसियाना युनिव्हर्सिटी, हॅमंड, लुईझियाना येथून शिक्षण घेतले आहे. त्याने फ्रँकलिन पियर्स विद्यापीठात सहाय्यक टेनिस प्रशिक्षक म्हणूनही काही काळ काम केले.
नीरज चोप्रा हा भारताचा क्रीडा क्षेत्रातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने आपल्या मेहनतीने आणि कामगिरीने जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे.
नीरज चोप्रा भारताच्या सर्वोत्कृष्ट भालाफेकपटूंपैकी एक आहे. त्यानं 2020 सालच्या टोकियो येथील ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.