Sameer Amunekar
भारत आणि इंग्लंड यांच्यात यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका (T20 Series) आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.
या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ही मालिका 22 जानेवारीपासून सुरू होईल. या दौऱ्यात पहिल्या टी-20 मालिका खेळवली जाईल. तर 6 फेब्रुवारीपासून दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका खेळवली जाईल.
एकदिवसीय मालिकेत सर्वांच्या नजरा किंग विराटवर असणार आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.
आता आगामी एकदिवसीय मालिकेत विराट कोहलीकडे एक अनोखा विक्रम आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी आहे.
सचिन तेंडुलकरने इंग्लंडविरुद्ध 1455 धावा केल्या आहेत. आता जर विराट कोहलीने एकदिवसीय मालिकेत 116 धावा केल्या तर तो सचिन ला मागे टाकेल.
या मालिकेत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14000 पेक्षा जास्त धावा पूर्ण करू शकतो. विराटने एकदिवसीय सामन्यांमध्ये 13906 धावा केल्या आहेत.