Manish Jadhav
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या 5 टी20 सामन्यांच्या मालिकेत पहिले तीन सामने झाले असून, तिसरा सामना भारताने 5 विकेट्सने जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
मालिकेतील चौथा आणि महत्त्वाचा सामना 6 नोव्हेंबर रोजी क्वीन्सलँड येथील ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यातून दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण करण्यापासून फक्त 2 विकेट्स दूर आहे.
बुमराहने चौथे टी20 सामन्यात 2 विकेट्स घेतल्यास, तो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, वनडे, टी20) 100 हून अधिक विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरेल.
टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 100 विकेट्सचा टप्पा पार करणारा बुमराह हा दुसरा भारतीय गोलंदाज ठरेल. यापूर्वी, अर्शदीप सिंगने ही कामगिरी केली आहे.
बुमराहने आतापर्यंत 78 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 18.02 च्या सरासरीने 98 विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये बुमराहचा रेकॉर्ड नेहमीच चांगला राहिला आहे. त्याने 17 सामन्यांमध्ये 24 च्या सरासरीने 19 विकेट्स घेतल्या आहेत.
या सामन्यात बुमराहने केवळ एक विकेट जरी घेतली, तरी तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत पाकिस्तानचा माजी गोलंदाज सईद अजमलला मागे टाकेल.