Manish Jadhav
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 31 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे खेळला जाणार आहे.
या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनण्याची संधी आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम सध्या पाकिस्तानच्या सईद अजमलच्या (19 विकेट्स) नावावर आहे.
बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 15 टी-20 सामन्यांत 17 विकेट्स घेतल्या आहेत. अजमलचा विक्रम मोडण्यासाठी त्याला 3 विकेट्सची गरज आहे.
बुमराहसह पाकिस्तानचा मोहम्मद आमिर आणि न्यूझीलंडचे मिचेल सँटनर व ईश सोढी यांनीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी 17 विकेट्स घेतल्या आहेत.
बुमराहने टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 76 सामन्यांत 96 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 6.35 इतका प्रभावी आहे.
बुमराहने टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये अद्याप एकदाही चार किंवा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केलेला नाही.