Manish Jadhav
महिला वनडे वर्ल्डकप 2025च्या सेमीफायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोलव्हार्ट हिने शानदार फलंदाजी करत 169 धावांची धडाकेबाज खेळी खेळली.
या शतकी खेळीसह वोलव्हार्ट महिला वर्ल्ड कपच्या नॉकआऊट सामन्यांमध्ये शतक झळकावणारी जगातील पहिली कर्णधार ठरली.
तिच्या 169 धावांच्या या वादळी खेळीत 20 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.
इंग्लंडविरुद्ध झळकावलेले हे शतक तिच्या वनडे (ODI) कारकिर्दीतील 10 वे शतक ठरले. वर्ल्ड कपमध्ये तिचे हे पहिले शतक आहे.
वोलव्हार्ट आता दक्षिण आफ्रिकेकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (10) झळकावणारी फलंदाज बनली.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (10) करण्याच्या विक्रमात तिने इंग्लंडच्या नॅट सीव्हर ब्रंटची बरोबरी साधली आहे.
वर्ल्ड कपच्या नॉकआऊट सामन्यात इंग्लंडविरुद्ध शतक ठोकणारी ती ऑस्ट्रेलियाच्या ऍलिसा हीलीनंतरची दुसरी खेळाडू ठरली.
वोलव्हार्टने सलामीला येत इंग्लिश गोलंदाजांची जोरदार धुलाई केली आणि अवघ्या 115 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.