Manish Jadhav
भारत आणि इंग्लंड यांच्यात 20 जूनपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारतीय धाकड आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
जगातील महान गोलंदाजांपैकी एक असलेला जसप्रीत बुमराह एका मोठ्या रेकॉर्डच्या अगदी जवळ पोहोचला आहे. जो पाकिस्तानच्या वसीम अक्रमने अनेक वर्षांपूर्वी केला होता. आता बुमराहला त्याचा हा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत बुमराह अक्रमचा विक्रम मोडू शकतो. जसप्रीत हा रेकॉर्ड मोडून आपली बादशाहत प्रस्थापित करु शकतो.
जसप्रीत बुमराह इंग्लंडमध्ये एक विकेट घेताच तो वसीम अक्रमची बरोबरी करेल, तर दोन विकेट घेताच तो त्याला मागे सोडेल.
पहिल्या कसोटीतच दोन विकेट घेणे जसप्रीत बुमराहसाठी कठीण काम नाही. जर भारताने पहिल्या कसोटीत पहिल्यांदा गोलंदाजी केली तर बुमराह 20 जून रोजीच हा रेकॉर्ड आपल्या नावावर करु शकतो.
जसप्रीत बुमराहने 2018 मध्ये कसोटी पदार्पण केले.
बुमराहने आतापर्यंत 45 कसोटी सामन्यांमध्ये 205 बळी घेतले आहेत. या मालिकेत बुमराह अनेक रेकॉर्ड्स गवसणी घालू शकतो.