Manish Jadhav
संसदेचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी राज्यसभेच्या सभागृहात 222 क्रमांकाच्या सीटवर पैशांचा बंडल मिळाल्याची माहिती राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी दिली.
काल (गुरुवारी) संसदेचं कामकाज स्थगित झाल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांना सीट नंबर 222 नंबरच्या सीटखाली पैशांचं बंडल मिळाला. ही जागा राज्यसभा खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्यासाठी अलॉट करण्यात आली आहे.
जगदीप धनखड यांनी संबंधित माहिती दिल्यानंतर सभागृहात एकच हल्लकल्लोळ उडाला. सत्ताधाऱ्यांनी सिंघवी यांना निशाण्यावर घेतले.
दरम्यान, या आरोपांवर अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्यासाठी ही गोष्ट अतिशय गंभीर आणि हास्यास्पद आहे.''
भाजप नेते आणि खासदार मनोज तिवारी यांनीही या घटनेवर चिंता व्यक्त केली. संसदेतून नोटा जप्त झाल्याची घटना धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, 'जोपर्यंत या घटनेची पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत सिंघवी यांना दोषी ठरवणे योग्य होणार नाही.'