Manish Jadhav
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे. या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज आहे.
याशिवाय तो काही काळ आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज राहिला आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने आता 2025 सालची पहिली रँकिंगही जाहीर केली आहे.
जसप्रीत बुमराहने या क्रमवारीत इतिहास रचला आहे. बुमराहने असा पराक्रम केला आहे, जो यापूर्वी कोणताही भारतीय गोलंदाज करु शकला नव्हता.
बुमराहने अलीकडेच मेलबर्न कसोटीत 9 विकेट्स घेतल्या होत्या. या दमदार कामगिरीचा त्याला क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा कसोटी गोलंदाज म्हणून आपली आघाडी मजबूत करण्यात मदत झाली. बुमराहचे आता 907 रेटिंग गुण झाले.
यासह तो आयसीसी क्रमवारीच्या इतिहासातील सर्वोच्च क्रमांकाचा भारतीय कसोटी गोलंदाज बनला आहे. याआधी भारताच्या कोणत्याही गोलंदाजाला कसोटी क्रमवारीत इतके रेटिंग गुण मिळवता आले नाहीत.
जसप्रीत बुमराहसाठी 2024 हे वर्ष लकी ठरले. त्याने 21 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 13.76 च्या सरासरीने 86 विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये त्याने पाच वेळा 5 बळी घेण्याचा पराक्रमही केला.
त्याचबरोबर त्याने 13 कसोटी सामन्यात 71 विकेट घेतल्या. दुसरीकडे, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये त्याने आतापर्यंत 4 सामन्यात 30 विकेट घेतल्या आहेत. या यादीत अन्य कोणताही गोलंदाज बुमराहच्या जवळपासही नाही.