Manish Jadhav
मेलबर्न कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 184 धावांनी दारुण पराभव झाला.
पाचव्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला तर मालिका बरोबरीत सुटेल. चार सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया 2-1 ने आघाडीवर आहे.
चौथ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माचं नेतृत्व अपयशी ठरलं. खरं तर चौथ्या कसोटीत शुबमन गिलला वगळणं टीम इंडियाला महागात पडलं.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत फार काही ग्रेट करु शकले नाहीत. चौथ्या कसोटीत दोघांकडून खूप आपेक्षा होत्या. मात्र त्यांनी हिरमूड केला.
मेलबर्न कसोटीत फलंदाजीचा क्रम बदलणं टीम इंडियाच्या अंगलट आलं. रोहित शर्मा ओपनर म्हणून अपयशी ठरला.
ऋषभ पंतची बेजबाबदार खेळीही पराभवाला कारणीभूत ठरली. चुकीच्या शॉट सिलेक्शनमुळे टीम इंडियाला फटका बसला.
टीम इंडिया मेलबर्न कसोटी वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरली होती. फिरकीची जादू चालली नाही.