बुमराहच्या करियरमधील मौल्यवान पहिल्या विकेट्स

Pranali Kodre

प्रमुख गोलंदाज

जसप्रीत बुमराह हा भारतीय क्रिकेट संघातील प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे.

Jasprit Bumrah | Twitter

प्रभावित करणारी गोलंदाजी

बुमराहने आत्तापर्यंत त्याच्या गोलंदाजी शैलीने चाहत्यांसह अनेक क्रिकेट तज्ञांनाही प्रभावित केले आहे.

Jasprit Bumrah | Twitter

पदार्पण

बुमराह 2013 पासून आयपीएल खेळत आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 2016 साली पदार्पण केले.

Jasprit Bumrah | Twitter

पदार्पण गाजवले

विशेष म्हणजे आयपीएल, वनडे, टी20 आणि कसोटी पदार्पणातच त्याने दिग्गज फलंदाजांच्या विकेट्स घेत पदार्पण गाजवले.

Jasprit Bumrah | Dainik Gomantak

कसोटी पदार्पण

बुमराहने जानेवारी 2018 मध्ये केपटाऊनला कसोटी पदार्पण केले, त्यावेळी त्याने पहिली विकेट मिस्टर 360 म्हणजेच एबी डिविलियर्सची घेतली होती.

Jasprit Bumrah | ICC

वनडे पदार्पण

त्यापूर्वी बुमराहने 23 जानेवारी 2016 रोजी सिडनीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने त्याची पहिली विकेट स्टीव्ह स्मिथची घेतली.

Jasprit Bumrah | ICC

आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण

त्यानंतर बुमराहने 26 जानेवारी 2016 रोजी ऍडलेडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याने पहिल्यांदा डेव्हिड वॉर्नरला बाद केले होते.

Jasprit Bumrah | Dainik Gomantak

आयपीएल पदार्पण

बुमराहने 4 एप्रिल 2013 रोजी मुंबई इंडियन्सकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध आयपीएल पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने विराट कोहलीच्या रुपात पहिली आयपीएल विकेट मिळवली.

Jasprit Bumrah | Dainik Gomantak

30 जागा, 165 खेळाडू! WPL लिलावाबद्दल 5 महत्त्वाचे मुद्दे

Auction | IPL
आणखी बघण्यासाठी