दैनिक गोमन्तक डिजिटल
जपानी लोक जीवनात आनंद आणि उद्देश शोधण्यावर भर देतात. दररोज काहीतरी आवडीचं काम करणं मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
जपानमध्ये ‘हारा हाची बु’ ही संकल्पना प्रसिद्ध आहे. पोट पूर्ण भरण्याऐवजी 80% भरल्यावर जेवण थांबवल्याने आरोग्य चांगलं राहू शकतं.
लांब चालणे, सायकल चालवणे किंवा हलका व्यायाम ही जपानी जीवनशैलीची खासियत आहे. यामुळे शरीर तंदुरुस्त राहते.
मासे, भाज्या, फळे आणि कमी प्रक्रिया केलेले पदार्थ यांचा आहारात समावेश केल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात.
कुटुंब, मित्र आणि समाजाशी जोडलेले राहिल्याने तणाव कमी होतो आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते.
नियमित आणि गुणवत्तापूर्ण झोप शरीराची दुरुस्ती करते तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
ध्यान, योग, निसर्गात वेळ घालवणे आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे मन शांत राहते आणि दीर्घकाळ निरोगी जीवन जगता येते.