Pranali Kodre
इटलीच्या 22 वर्षीय टेनिसपटू यानिक सिन्नरने ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे.
सिन्नरने 28 जानेवारी 2024 रोजी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या मानांकित डॅनिल मेदवेदेवला पराभवाचा धक्का दिला.
सिन्नरने मेदवेदेवला तीन तास 44 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात 3-6,3-6,6-4,6-4,6-3 अशा पाच सेटमध्ये पराभूत केले.
दरम्यान सिन्नरचे हे पहिलेच ग्रँडस्लॅमचे विजेतेपद आहे.
या विजेतेपदामुळे सिन्नर 1976 नंतर ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिलाच इटलीचा टेनिसपटू आहे, तर एकूण तिसरा इटलीच्या खेळाडू आहे.
सिन्नरने अंतिम सामन्यात पहिले दोन सेट गमावले होते. परंतु, तिसऱ्या सेटपासून सिन्नरने शानदार पुनरागमन केले आणि सलग तीन सेट जिंकत सामना जिंकला.
विशेष म्हणजे सिन्नरने या स्पर्धेत उपांत्य फेरीत दिग्गज नोवाक जोकोविचला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली होती.