Sameer Amunekar
अरबी समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला जंजिरा किल्ला शत्रूंना जिंकणे अत्यंत कठीण असा अभेद्य किल्ला मानला जातो.
सिद्दी सरदारांच्या ताब्यात असलेला हा किल्ला मजबूत संरक्षण, आरमारी ताकद आणि तोफखान्यासाठी प्रसिद्ध होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक डावपेच आखले, पण समुद्रातील भक्कम रचना व सिद्दींची ताकद यामुळे जंजिरा जिंकता आला नाही.
संभाजी महाराजांनीही जंजिरा काबीज करण्याचे प्रयत्न केले; मात्र किल्ल्याची अभेद्यता कायम राहिली.
सुमारे चारशे वर्षे जंजिरा किल्ला कधीही पूर्णतः जिंकला गेला नाही, ही त्याची सर्वात मोठी ओळख आहे. पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटीश सर्वांनी हा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले.
उंच तट, भुयारी प्रवेशद्वार आणि प्रचंड तोफा यामुळे किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने अतुलनीय ठरतो.
जंजिरा किल्ला आजही पर्यटकांना मराठा-सिद्दी संघर्षाची आठवण करून देणारा जिवंत इतिहास आहे.