Manish Jadhav
जांभळाच्या बियांमध्ये 'जम्बोलीन' आणि 'जंबोसिन' नावाचे घटक असतात. हे घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी त्या अत्यंत फायदेशीर आहेत.
जांभळाच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात.
या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर अनेक रोगांपासून सुरक्षित राहते.
जांभळाच्या बिया यकृताचे (liver) आरोग्य सुधारण्यास मदत करतात. त्यांच्यातील डिटॉक्सिफाइंग गुणधर्मांमुळे यकृत स्वच्छ राहते आणि त्याचे कार्य व्यवस्थित चालते.
काही संशोधनांनुसार, जांभळाच्या बियांमधील घटक कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करु शकतात.
या बियांचे सेवन केल्याने रक्तदाब (blood pressure) नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
जांभळाच्या बिया सुकवून त्यांची पावडर बनवता येते. ही पावडर पाण्यासोबत किंवा इतर पेयांमध्ये मिसळून सेवन करता येते. मधुमेही रुग्ण सकाळी रिकाम्या पोटी ही पावडर घेऊ शकतात.
जांभळाच्या बियांचे फायदे असले तरी, कोणत्याही गंभीर आजारासाठी वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अतिसेवन टाळावे.