Sameer Panditrao
जम्मू पर्यटन विभागाच्या प्रयत्नामुळे पुढील वर्षीच्या सुरुवातीला या प्रदेशाला नवीन ओळख मिळू शकते.
पुढील वर्षी व्यावसायिक तत्वावर जम्मू पॅराग्लायडिंगमध्ये घेणार भरारी.
जम्मूजवळ असलेले एथम हे पॅराग्लायडिंगचे ठिकाण असून येथे सध्या व्यावसायिक पॅराग्लायडिंगच्या चाचण्या घेतल्या जात आहेत.
पॅराग्लायडिंगसाठीचा टेक-ऑफ पॉईंट जम्मू शहरापासून १९ किमीवर असून सारधान ओढ्याच्या कडेला असलेल्या वाळूच्या प्रदेशात लॅंडिंग झोन आहे.
राष्ट्रीय गिर्यारोहण संस्थेतून जम्मूच्या २० जणांनी यापूर्वीच ‘पी१’, ‘पी२’ आणि ‘पी३’ हे संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत.
एथम परिसरात उड्डाणासाठी योग्य उतार, सातत्यपूर्ण वाऱ्याची परिस्थिती आणि निसर्गरम्य दृश्ये पाहता येत असल्याने तो पॅराग्लायडिंगसाठी आदर्श मानला जात आहे.
व्यावसायिक पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण दिलेल्या २० जणांच्या तुकडीचे नेतृत्व यातील एकमेव महिला डॉली शर्मा करत आहेत.