Sameer Panditrao
कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र यांचा व्यवहार, व्यापार पूर्वापार चालत आलेला आहे.
१८०० सालात वेंगुर्ला हे मोठे बंदर होते.
विशेषतः सावंतवाडी, कोल्हापूर बेळगाव परिसरात सामान आणण्यासाठी चांगल्या मार्गाची गरज भासू लागली.
१८५० च्या दरम्यान ब्रिटिश शासनाच्या काळात एका महत्वाच्या रस्त्याकडे लक्ष गेले.
ब्रिटिशांनी हा रस्ता दुरुस्त करून हा घाट वापरात आणला, तो म्हणजे आंबोली घाट.
कर्नल वेस्ट्रॉप यांनी आंबोली परिसराकडे समृद्ध हिल स्टेशन म्हणून पाहत या परिसराचा कायापालट केला.
तेंव्हापासून दळणवळणासाठी प्रचलित झालेला आंबोली घाट आजही लोकप्रिय आहे आणि पर्यटनाचे महत्वाचे स्थळ आहे.