Pranali Kodre
भारत विरुद्ध इंग्लंड संघात संघात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणमला सुरू झाला.
या सामन्यासाठी इंग्लंडने अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला देखील संधी दिली आहे.
त्यामुळे अँडरसनने भारतात कसोटी सामना खेळणारा सर्वात वयस्कर वेगवान गोलंदाज ठरला आहे.
2 फेब्रुवारी 2024 रोजी जेव्हा अँडरसन मैदानात उतरला, तेव्हा त्याचे वय 41 वर्षे 187 दिवस इतके होते.
यापूर्वी हा विक्रम लाला अमरनाथ यांच्या नावावर होता. त्यांनी 41 वर्षे 92 दिवस इतके वय असताना 1952 साली पाकिस्तानविरुद्ध कोलकाता येथे सामना खेळला होता.
भारतात कसोटी सामना खेळणारा सर्वात वयस्कर वेगवान गोलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे रे लिंडवॉल आहेत. त्यांनी 38 वर्षे 112 दिवस वय असताना 1960 साली भारतात कसोटी सामना खेळला होता.
भारताचे वेगवान गोलंदाज सरोदिंदू बॅनर्जी यांनी एकमेव कसोटी सामना खेळला, जो त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर 1949 साली खेळला. त्यावेळी त्यांचे वय 37 वर्षे 124 दिवस होते.
पाचव्या क्रमांकावर गुलाम गार्ड असून भारताकडून वेगवान गोलंदाज म्हणून त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1960 साली 34 वर्षे 20 दिवस वय असताना ब्रेबॉर्नलाच सामना खेळला होता.