Akshata Chhatre
नारळ हा फक्त पूजेपुरता मर्यादित नाही. तुम्ही त्याचा रोजच्या जेवणात वापरून आरोग्यदायी आणि चवदार उपयोग करू शकता. कसा? चला जाणून घेऊया.
तुम्हाला कोकोनट मिल्क म्हणजेच नारळाच्या दुधाचा गोव्यात बऱ्यापैकी वापर होतो. नारळाचं दूध वापरून कोकणी आणि थाई स्टाइल भाज्या व रस्सा तयार करता येतो.
ओला नारळ खवून आमटी किंवा वरणात टाकलं तर त्याचा टेक्श्चर वाढतो. याशिवाय उसळ, पोह्यांवर नारळाचं खोबरं शिंपडलं तर त्याची चव वाढते.
शेंगदाण्याची आमटी करत असाल तर खोबऱ्याच्या तेलाची मस्त फोडणी द्या. नारळ शरीराला चांगले फॅट्स मिळवण्यासाठी उपयुक्त असतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यामुळे पचनक्रिया सुधारते.
गोवेकर जर का नारळाचा सर्वात जास्ती पदार्थ एन्जॉय करत असतील तर तो म्हणजे नारळाची वडी. ओल्या नारळाची बर्फी एक घरगुती पदार्थ आहे मात्र रुचीला उत्तम लागतो.
नारळ, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. जे इडली, डोसा, भाकरी, पोळी सर्वांसोबत छान जुकून येतं आणि खोबऱ्याच्या चटण्या या कोरड्या आणि ओल्या दोन्ही प्रकारे तयार करता येतात