Manish Jadhav
इटालियन टू-व्हिलर कंपनी VLF (Velocifero) ने घोषणा केली की, ते यावर्षी सणासुदीच्या काळात भारतात त्यांची नवीन Mobster स्कूटर लॉन्च करणार आहेत.
VLF Mobster हे कंपनीचे भारतातील दुसरे मॉडेल असेल. कंपनीने यापूर्वी VLF टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली होती. ही एक स्पोर्टी स्कूटर असेल, ज्यामध्ये इन-बिल्ट डॅशकॅम सारखे अनेक अत्याधुनिक फीचर्स असतील.
व्हीएलएफ भारतात ब्रिक्सटन मोटारसायकलींची विक्री करणाऱ्या मोटोहाऊसने भारतात आणले आहे. व्हीएलएफ मोबस्टर ही पेट्रोलवर चालणारी स्कूटर असेल जी विशेषतः तरुण ग्राहकांसाठी डिझाइन केलेली असेल.
प्रसिद्ध इटालियन डिझायनर अलेस्सांद्रो टार्टारिनी यांनी ती डिझाइन केलेली असेल. तिचा लूक हाय-परफॉर्मेंस असलेल्या स्ट्रीटफायटर मोटारसायकलींपासून प्रेरित असेल.
कंपनी लॉन्च करणारी ही शानदार स्कूटर दोन कलरमध्ये लॉन्च केली जाईल, ज्यामध्ये रेड आणि ग्रे कलरचा पर्याय असेल.
ही स्कूटर हाय टेन्साइल स्टील फ्रेमवर बनवललेली असेल. तसेच, हायड्रॉलिक सस्पेंशन मिळेल. दोन्ही चाकांमध्ये ब्रेकिंगसाठी डिस्क ब्रेक असतील. याशिवाय, अलॉय व्हील्स असतील ज्यावर प्रीमियम टायर्स बसवले जातील.
फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, स्कूटरमध्ये फ्रंट डॅशकॅम, लिक्विड कूलिंग आणि स्विचेबल ABS सारखी फीचर्स असतील. यासह, 5-इंचाचा TFT डिस्प्ले उपलब्ध असेल, जो राइड डेटा, सूचना आणि नियंत्रणे दर्शवेल.
आतापर्यंत कंपनीने इंजिनबद्दल फक्त एवढेच सांगितले आहे की, ते लिक्विड-कूल्ड असेल.