Sameer Panditrao
‘निसार’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता भारतीय अवकाश संशोधन संस्था (‘इस्रो’) लवरकच अमेरिकेचा आणखी एक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणार आहे,
संदेश वहनासाठी वापरण्यात येणारा हा उपग्रह सुमारे सहा हजार ५०० किलो वजनाचा असेल.
आज जगभरातील ४३ देशांचे सुमारे ४३३ उपग्रह स्वतःच्या प्रक्षेपकाद्वारे यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहेत.
१९६३ मध्ये अमेरिकेने ‘इस्रो’च्या स्थापनेनिमित्त भारताला एक छोटासा प्रक्षेपक भेट दिला होता.
‘इस्रो’ने ‘निसार’चे प्रक्षेपण यशस्वीरीत्या केल्याबद्दल अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’नेदेखील ‘इस्रो’चे कौतुक केले.
कधीकाळी अमेरिकेकडून एक छोटे रॉकेट भारताला भेट म्हणून मिळाले होते.
आज आपण प्रगत राष्ट्रांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहोत