Sameer Amunekar
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (ISRO) बुधवारी सकाळी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून आपलं ऐतिहासिक 100 वं प्रक्षेपण केलं.
इस्रोकडून NVS-02 उपग्रहासह GSLV-F15 हे अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून सकाळी 6.23 वाजता प्रक्षेपित करण्यात केलं.
इस्रोचं 2025 चं हे पहिलंच प्रक्षेपण आहे. सुमारे 20 मिनिटांत उपग्रह यशस्वीरित्या कक्षेत स्थापित करण्यात आला.
जीएसएलव्ही-एफ15 हे भारताच्या जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (जीएसएलव्ही) चं 17 वं मिशन होतं. त्यात 11व्यांदा स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनचा वापर करण्यात आला.
इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांच्या नेतृत्वाखालील हे पहिलेच मिशन आहे. त्यांनी 13 जानेवारी रोजी पदभार स्वीकारला. प्रक्षेपणापूर्वी, इस्रोचे अध्यक्ष नारायणन यांनी तिरुपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं.
NVS-02 हा NavIC प्रणाली अंतर्गत विकसित केलेल्या नवीन पिढीच्या नेव्हिगेशन उपग्रहांपैकी दुसरा आहे. या उपग्रहाचं वजन सुमारे 2,250 किलो आहे.