Israel-Hamas War: गाझामधून परतले 'इस्त्रायली सैन्य'

Manish Jadhav

इस्त्रायल आणि हमास युद्ध

इस्त्रायल आणि हमास यांच्यात लवकरच युद्धविराम होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. गाझामधील परिस्थिती पाहता पुन्हा एकदा युद्धविराम लवकरच होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

Israel-Hamas War | Dainik Gomantak

युद्ध थांबण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव

मागील सहा महिन्यांपासून सुरु असलेले युद्ध थांबवण्यासाठी इस्त्रायलवर थांबण्यासाठी आतंरराष्ट्रीय दबाव वाढत चालला आहे. ईदपूर्वी पश्चिम आशियातील अर्थात अरब देशांमधील संबंध पुन्हा सामान्य होतील अशी शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत.

Israel-Hamas War | Dainik Gomantak

इस्त्रायली सैन्यांची माघार

इस्रायलने आता गाझामधून आपले सैन्य मागे घेतले आहे. ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या युद्धाला सहा महिने उलटले असून रविवारी इस्रायलने दक्षिण गाझामधून अचानक सैन्य मागे घेतले. या निर्णयाची माहिती इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी दिली. इस्रायलचे म्हणणे आहे की, आता दक्षिण गाझामध्ये फक्त एक इस्त्रायली ब्रिगेड उरली आहे.

Israeli Army | Dainik Gomantak

युद्धविरामासाठी चर्चा

दरम्यान, चर्चेची नवी फेरी सुरु व्हावी यासाठी इस्रायल आणि हमास या दोघांनीही इजिप्तला शिष्टमंडळ पाठवल्यामुळे आशेचा किरणही निर्माण झाला आहे. त्यामुळे ईदच्या निमित्ताने पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

Israel-Hamas War | Dainik Gomantak

पॅलेस्टिनी नागरिक परतू लागले

बेंजामिन नेतन्याहू सरकारने सैन्य मागे घेतल्यानंतर आता खान युनिस शहरात पॅलेस्टिनी नागरिक परत येऊ लागले आहेत. आत्तापर्यंत डिटेंशन कॅम्पमध्ये राहणारे लाखो लोक आपल्या घराकडे परतू लागले आहेत.

Palestine Women | Dainik Gomantak

खान युनिस शहर हमासचा प्रमुखाचा बालेकिल्ला

खान युनिस शहर हे हमासचा गाझा प्रमुख याह्या सिनवार याचा बालेकिल्ला आहे. तो याच ठिकाणचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की, याह्या सिनवार हा 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे.

Yahya Sinwar | Dainik Gomantak

अमेरिकेचा दबाब

तथापि, इस्रायलचे म्हणणे आहे की त्यांचे सैन्य अजूनही महत्त्वाच्या आघाड्यांवर तैनात आहे. दरम्यान, अमेरिकेच्या दबावानंतर इस्रायलने हा निर्णय घेतल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

America President Joe Biden | Dainik Gomantak

सैन्य माघारीबाबत नेतन्याहू म्हणाले

सैन्य मागे घेण्याच्या निर्णयाबद्दल नेतन्याहू म्हणाले की, ''इस्रायल करारासाठी तयार आहे, परंतु आम्ही शरणागती पत्करणार नाही. या हल्ल्यात आमचे 1200 लोक मारले गेले आहेत. आम्ही त्यांना विसरु शकत नाही.''

Israeli Prime Minister Benjamin Netanyahu | Dainik Gomantak

7 ऑक्टोबर रोजी हमासचा इस्त्रायलवर हल्ला

हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर मोठा हल्ला केला, ज्यामध्ये 1200 लोक मारले गेले. याशिवाय, सुमारे 250 जणांचे अपहरण करण्यात आले होते. तेव्हापासून इस्रायल गाझावर सातत्याने हल्ले करत आहे.

Israel-Hamas War | Dainik Gomantak
CJI Chandrachud | Dainik Gomantak