Manish Jadhav
सर्वोच्च न्यायलयाचे सरन्यायाधीश (CJI) डीवाय चंद्रचूड यांनी देशभरातील बार कॉन्सिल आणि बार असोसिएशनमध्ये महिलांच्या कमतरतेवर नाराजी व्यक्त केली आहे.
वकील संघटनांमध्ये महिलांच्या कमी प्रतिनिधित्वावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, वकिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थांमध्ये महिलांच्या निवडीसाठी अनुकूल परिस्थितीचा अभाव आहे. त्यामुळे वकिलांच्या संघटना, म्हणजे बार असोसिएशन आणि बार कौन्सिल हे ‘ओल्ड बॉईज क्लब’ बनले आहेत.
तथापि, चंद्रचूड म्हणाले की अलिकडच्या वर्षांत महिला वकिलांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे, तरीही निवडून आलेल्या बार कौन्सिल आणि बार असोसिएशनमध्ये त्यांचा सहभाग अद्याप वाढलेला नाही.
बारसह न्यायव्यवस्थेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याची गरज त्यांनी (सरन्यायाधीश) व्यक्त केली. बार कौन्सिल ऑफ इंडियामध्ये एकही महिला अधिकारी नसल्याबद्दल सरन्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली.
सरन्यायाधीशांनी महिला वकिलांनाही बार असोसिएशनमध्ये त्यांचे स्थान मजबूत करण्याचे आवाहन केले. महिलांनी निवडणूक लढवून जबाबदारीची पदे भूषवावी असे आवाहनही त्यांनी केले.