दुबईच्या रॉयल फॅमिलीचा रॉयल अंदाज

Manish Jadhav

दुबईची आलिशानता

संयुक्त अरब अमिरातीची राजधानी दुबईची ओळख सर्वात श्रीमंत शहर अशी आहे. दुबईच्या अल नाहयान यांच्या रॉयल फॅमिलीकडे प्रचंड संपत्ती आहे.

Dubai | Dainik Gomantak

रॉयल फॅमिली

अल नाहयान यांच्या रॉयल फॅमिलीची संपत्ती जाणून तुम्हीही चकीत व्हाल. या कुटुंबाकडे 4,078 कोटी रुपयांचा भव्य राजवाडा आहे. त्यांच्याकडे 8 खाजगी जेट आणि एक प्रसिद्ध फुटबॉल क्लब देखील आहे.

Al Nahyan Royal Family | Dainik Gomantak

GQ चा रिपोर्ट

GQ च्या अहवालात जगातील सर्वात श्रीमंत फॅमिली म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान आहेत, ज्यांना MBZ म्हणूनही ओळखले जाते.

Al Nahyan | Dainik Gomantak

अल नाहयान यांची फॅमिली

नाहयान यांना 18 भाऊ आणि 11 बहिणी आहेत. अमिराती राजघराण्याला नऊ मुले आणि 18 नातवंडेही आहेत. या कुटुंबाकडे जगातील 6 टक्के तेलसाठा आहे. याशिवाय, मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लब आणि गायक रिहानाचा ब्युटी ब्रँड फेंटी ते एलन मस्कच्या स्पेस एक्ससह अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये स्टेक आहेत.

Al Nahyan | Dainik Gomantak

कार कलेक्शन

राष्ट्रपतींचे धाकटे भाऊ शेख हमद बिन हमदान अल नाहयान यांच्याकडे 700 हून अधिक कार आहेत. यामध्ये 5 Bugatti Veyron, Lamborghini Reventon, Mercedes-Benz CLK GTR, Ferrari 599XX आणि McLaren MC12 सोबत जगातील सर्वात मोठी SUV समाविष्ट आहे.

Al Nahyan | Dainik Gomantak

सोन्याने बनवलेल्या पॅलेसमध्ये वास्तव्य

या कुटुंबातील लोक अबुधाबीमध्ये सोन्याने बनवलेल्या कसर अल-वतन प्रेसिडेंशियल पॅलेसमध्ये राहतात. UAE मध्ये असलेल्या अशा अनेक राजवाड्यांपैकी हे सर्वात मोठे आहे. हा महाल सुमारे 94 एकरमध्ये पसरलेला आहे.

Al Nahyan | Dainik Gomantak

पॅरिस आणि लंडनसारख्या शहरात मालमत्ता

दुबईच्या या राजघराण्याकडे केवळ संयुक्त अरब अमिरातीमध्येच नाही तर पॅरिस आणि लंडनसारख्या महागड्या शहरांमध्येही त्यांची मालमत्ता आहे.

Al Nahyan | Dainik Gomantak