Sameer Panditrao
गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धसंघर्षामुळे अन्न, औषधे, स्वच्छ पाणी आणि वीज यांचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे.
रुग्णालयांमध्ये हजारो नागरिकांवर उपचार सुरू आहेत. संघर्षामुळे अनेक रुग्णालये उद्ध्वस्त झाली असून, अनेक भागांमध्ये आरोग्यसेवा जवळपास कोलमडली आहे.
दोन वर्षांच्या सततच्या इस्राईलच्या बॉम्बहल्ल्यानंतर, गाझा हे ढिगाऱ्यांचे शहर बनले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, ८० टक्के इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत
इस्राईल-हमाससंघर्ष सुरू होण्यापूर्वी गाझामध्ये ८५० शाळा होत्या. आज त्यापैकी ९० टक्के शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
गाझामधील १० विद्यापीठांच्या ५१ इमारतींपैकी एकही इमारती सुरू करण्याच्या स्थितीत नाही. ३०,००० कोटी रुपयांच्या शैक्षणिक पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
गाझाची जमीन हल्ल्यापूर्वी सुपीक होती. मात्र, इस्राईलच्या हल्ल्यानंतर ती नापीक झाली आहे. अंदाजे ९८.५% शेतजमीन नष्ट झाली आहे.
८३ टक्के सिंचन विहिरींचे नुकसान झाले आहे. तेथील शेतकऱ्यांनी आपली व्यथा सातत्याने आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर मांडली आहे.