Manish Jadhav
आयपीएल 2025 धूमधडाका संपल्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर पोहोचली. येथे सर्व खेळाडूंनी सरावही सुरु केला. 20 जूनपासून हेडिंग्ले येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे.
पहिल्यांदाच टीम इंडिया युवा शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली कसोटी सामन्यांमध्ये खेळताना दिसेल. या दौऱ्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा टीम इंडियाचा भाग नसतील. अशा परिस्थितीत धावा करण्याची जबाबदारी शुभमन गिल आणि ऋषभ पंत सारख्या तरुणांवर असेल.
जर इंग्लंडमध्ये पंतची बॅट तळपली तर तो कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठा रेकॉर्ड नावावर करेल. पंत इंग्लंडमध्ये इतिहास रचण्यापासून काही पाऊल दूर आहे.
जर त्याने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 222 धावा केल्या तर तो महेंद्रसिंग धोनीचा रेकॉर्ड मोडेल. एवढचं नाहीतर इंग्लंडच्या भूमीवर कसोटीत सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक-फलंदाजही बनेल.
इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या परदेशी यष्टीरक्षक-फलंदाजांच्या यादी धोनी अव्वल स्थानी आहे. धोनीने इंग्लंडमध्ये 23 डावात एकूण 778 धावा केल्या आहेत. आता धोनीचा हा शानदार रेकॉर्ड मोडण्याची ऋषभला नामी संधी आहे.
या यादीत ऋषभ पंत 555 धावांसह सातव्या क्रमांकावर आहे. त्याने केवळ 17 डावांमध्ये या धावा केल्या आहेत. आता पंतकडे हा आकडा ओलांडण्याची संधी आहे.