Akshata Chhatre
आपल्यासाठी जर का सर्वाधिक कोणी काम करत असेल तर ते म्हणजे आपले डोळे, त्यामुळे आपल्या डोळ्यांची काळजी घेणं महत्वाचं आहे.
डोळ्यांची काळजी घेण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणचे तुमच्या आहारात काही उत्तम खाद्यपदार्थांचा समावेश करणं. यात हिरव्या पालेभाज्या, गाजर, रताळे ओमेगा-३ युक्त पदार्थ हे पोषकद्रव्य मोतीबिंदू आणि दृष्टिदोष रोखण्यास मदत करतात.
UV किरणांपासून संरक्षणकरण्यासाठी 99–100% UVA/UVB संरक्षण असलेले सनग्लासेस वापरा ढगाळ हवामानातसुद्धा चष्मा महत्वाचा असतो.
दर 20 मिनिटांनी 20 फूट दूर बघा 20 सेकंदासाठी यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो.
धूम्रपानामुळे डोळ्यांचा आजार वाढण्याचा धोका अधिक असतो. यात मोतीबिंदू,ऑप्टिक नर्व्हचे नुकसान, वयोपरत्वे येणारा अंधत्व अशा आजारांचा समावेश असतो.
पुरेसे पाणी प्या, यामुळे कोरडेपणा टाळता येतो. अश्रूंची निर्मिती सुधारतो आणि त्वचा व डोळ्यांची अवस्था चांगली राहते