Akshata Chhatre
मांजरी शांत आणि खेळकर दिसत असल्या तरी त्यांना काही आजार गुपचूप त्रास देत असतात. वेळेवर लक्ष दिलं तर त्यांचं आरोग्य टिकवता येतं.
सर्दी, खोकला, डोळ्यांतील पाणी येणं ही फेलाइन रेस्पिरेटरी इन्फेक्शनची लक्षणं आहेत. वेळेवर उपचार न केल्यास यामुळे गंभीर होऊ शकतो.
अचानक अन्न न खाणं, उलटी होणं हे अन्न न पचल्याची सामान्य लक्षणं असून जास्त वेळ झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
दातांवर प्लाक जमा होणं, हिरड्यांत सूज किंवा रक्त येणं ही डेंटल डिजीजची लक्षणं असतात. यावार उपाय म्हणून नियमित दातांची स्वच्छता गरजेची आहे.
जास्त पाणी पिणं, थकवा येणं, वजन कमी होणं यामुळे किडनीचा त्रास होऊ शकतो.
तुमची मांजर वेगळी वागतेय का? अन्न सोडतेय का? ताबडतोब व्हेटला दाखवा. लवकर निदान आणि उपचार हेच सुरक्षित आरोग्याचं रहस्य आहे.