Akshata Chhatre
तुळशीला 'वायुशुद्धीकारक' व 'तणावनिवारक' वनस्पती म्हणून ओळखलं जातं. घरात तुळशीचं रोप ठेवणं मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत लाभदायक म्हटलं जातं.
तुळशीच्या पानांचा सुगंध नैसर्गिकरित्या मन शांत करतो आणि चित्त स्थिर करण्यास मदत करतो.
तुम्ही चहाप्रेमी असाल तर जाणून घ्या तुळशीपासून तयार होणारा हर्बल चहा चिंता आणि तणाव दूर करण्यास उपयुक्त ठरतो.
तुम्ही जर का योगसाधना किंवा व्यायाम करत असाल तर तुळशीपाशी ध्यानधारणा केल्याने मेंदूला शांतता लाभते आणि स्ट्रेस हॉर्मोन्स नियंत्रित व्हायला मदत मिळते.
शास्त्रांनुसार,तुळस नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात सकारात्मक वातावरण निर्माण करते, ज्याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावर होतो.
तुळस हे केवळ एक धार्मिक किंवा औषधी रोप नाही तर ते आपल्या मानसिक आरोग्याचं रक्षण करणारा एक नैसर्गिक साथी आहे.