Akshata Chhatre
गोवा अनेकवर्ष पोर्तुगीज जुलुमी राजवटी खाली होता आणि म्हणून इथे पोर्तुगीज भाषेचा उल्लेख आढळतो.
एवढी वर्ष परकीय सत्तेत काढल्यानंतर गोव्यात अजूनही लोकं पोर्तुगीज भाषा बोलत असतील एक?
गोव्यात बऱ्यापैकी कोकणी आणि मराठी भाषिक आहेत असं ऐकलं असेलच पण पोर्तुगीज भाषेचं काय?
गोव्यात पोर्तुगीज भाषा दैनंदिन कामात वापरणारे लोकं आढळून येत नाहीत. कागदी व्यवहारांमध्ये देखील आता या भाषेचा वापर नसतो.
मात्र अजूनही बोली भाषेत अनेकवेळा पोर्तुगीज शब्दांचा उल्लेख होतोच. बाहेरून आलेल्या लोकांना हे शब्द कोकणीच वाटतात, पण तसं नाही.
गोव्यातील जुनी, वयस्क माणसं पोर्तुगीज भाषेचा वापर करत अनेकवेळा हे ख्रिश्चन बांधव असतात.
गोव्यातील ५ टक्के जनतेला पोर्तुगीज भाषा समजते पण या भाषेचा वापर होत नाही.