Akshata Chhatre
"रात्री घुबड ओरडले, म्हणजे काही वाईट घडणार..." अशी वाक्ये आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत.
काळ्या सावल्यांमध्ये रात्री उडणारा, मोठ्या डोळ्यांनी पाहणारा हा पक्षी लोकांच्या कल्पनांमध्ये भीतीचे, अशुभतेचे प्रतीक ठरला. परंतु, खरोखरच घुबड म्हणजे अशुभ संकेत आहे का?
भारतीय लोककथांमध्ये घुबडाला मृत्यु, गरिबी आणि संकटांचे दूत मानले गेले आहे.
काही ठिकाणी, विशेषतः तांत्रिक विधींमध्ये, घुबडांचा बळी देऊन धनलाभ होतो, अशी विकृत समजूत आजही प्रचलित आहे.
वास्तविक पाहता, घुबड निसर्गातील एक अत्यंत उपयुक्त शिकारी आहे. उंदीर, छोटे प्राणी आणि शेतीस हानी पोहोचवणाऱ्या जीवांचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
त्यांचे तीव्र श्रवण आणि दृष्टिक्षमतेमुळे ते अंधारातही अचूक शिकार करतात. एखाद्या शेतकऱ्याला खरी समृद्धी देणारा मित्र जर कुणी असेल, तर तो घुबड आहे.