Manish Jadhav
केळं हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, पण केळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यावे की नाही, याबद्दल अनेकदा गैरसमज आहेत. चला तर मग याविषयी जाणून घेऊया...
केळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. केळ्यामध्ये स्टार्च आणि नैसर्गिक शर्करा असते. पाणी प्यायल्याने हे पदार्थ विरघळतात आणि पचन प्रक्रिया मंदावते.
केळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने काही लोकांना पोटात गॅस होणे, पोट फुगणे किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. पचन व्यवस्थित न झाल्यामुळे ही समस्या उद्भवते.
आयुर्वेदानुसार, केळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास शरीरात कफ वाढू शकतो, ज्यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास होण्याची शक्यता असते.
केळ्यामध्ये नैसर्गिकरित्या पाण्याचे प्रमाण असते. त्यामुळे, केळं खाल्ल्यानंतर लगेच पाण्याची तीव्र गरज नसते. शरीराला पुरेसे पाणी मिळत असल्याने लगेच जास्त पाणी पिणे अनावश्यक ठरु शकते.
केळं खाल्ल्यानंतर साधारणपणे 20 ते 30 मिनिटांनी पाणी पिणे सुरक्षित मानले जाते. या वेळेत केळ्याचे अर्धवट पचन झालेले असते.
जर तुम्हाला केळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची तीव्र इच्छा झालीच, तर थोड्या प्रमाणात कोमट पाणी पिणे हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. थंड पाणी पिणे टाळावे.
ऍसिडिटीचा धोका
काही तज्ञांच्या मते, केळं खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पोटातील ऍसिड पातळ होते, ज्यामुळे पचन मंदावते आणि ऍसिडिटीचा (आम्लपित्त) त्रास वाढू शकतो.