Sameer Amunekar
राग आला की लगेच प्रतिक्रिया देऊ नका. डोळे बंद करून मनात १० पर्यंत अंक मोजा आणि खोल श्वास घ्या. यामुळे मन शांत होते.
समोरच्याचा दृष्टिकोन समजून घ्या. कदाचित त्याचा उद्देश तुम्हाला त्रास देणे नव्हता.
रागात वाईट बोलण्याऐवजी, शांतपणे भावना व्यक्त करा. जसं, "मला वाईट वाटलं कारण..." यामुळे संवाद सुधारतो.
जर खूप चिडचिड झाली असेल, तर त्या ठिकाणाहून थोडा वेळ बाजूला व्हा. स्वतःला शांत करण्यासाठी वेळ द्या.
व्यायाम व मेडिटेशनमुळे मानसिक स्थैर्य वाढते आणि रागावर नियंत्रण ठेवता येतं.
जे बदलता येत नाही, त्यावर त्रासून नका. त्याऐवजी सकारात्मक पर्याय शोधा.