गोमन्तक डिजिटल टीम
जीवघेण्या कोरोना विषाणूने अवघ्या जगाला वेठीस धरल्यानंतर आत्ता कुठे दोन वर्षापासून परिस्थिती सामान्य होत आहे.
अशात जगासमोर आणखी एका नव्या विषाणूचे संकट उभे राहिले असून, पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एचएमपीव्ही हा नवा विषाणू उद्भवल्याने जगभरात खबरदारी घेतली जात आहे. विविध देशात याबाबत गाईडलाईन जारी करण्यात आलीय.
चीनमध्ये या विषाणूचा उगम झाला असून, तिथे सध्या वैद्यकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. येथे काही रुग्ण दगावल्याचे देखील काही माध्यमांनी म्हटले आहे.
जगभरात देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला. भारतात काही रुग्ण आढळून आले असले तरी चिंताजनक स्थिती नाही.
कोरोनामुळे भारतासह जगभरात संपूर्ण ते अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. HMPV मुळे पुन्हा असे होण्याची शक्यता आहे का प्रश्न नेटकरी विचारतायेत.
पण, सध्याची परिस्थिती पाहता अशी शक्यता फारच कमी असल्याचे सांगितले जाते. विषाणू जास्त घातक नसला तरी खबरदारीचा सल्ला दिला जातोय.