Akshata Chhatre
सध्या राज्यात गरमीचं प्रमाण वाढलं आहे. गरमीच्या दिवसांमध्ये फळं खावी असं वाटत रहातं, पण सावधान ही फळं खाणं तुमच्यासाठी धोक्याचं तर नाही?
कॅल्शियम कार्बाईडने पिकवलेली फळं खायला गोड लागतात पण आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात हे तुम्हाला माहितीये का?
कॅल्शियम कार्बाईड हे एक रासायनिक द्रव्य आहे जे कृत्रिमरित्या फळं लवकर पिकवण्यासाठी वापरलं जातं.
कार्बाईड पाण्याच्या संपर्कात आल्यावर असेटिलीन गॅस निर्माण होते,जो शरीरासाठी विषारी आहे.
कार्बाईड पाण्याच्या संपर्कात आल्यावर असेटिलीन गॅस निर्माण होते,जो शरीरासाठी विषारी आहे. या गॅसमुळे डोकेदुखी, चक्कर येणं, थकवा जाणवणं, झोप न येणं असे मेंदूवर परिणाम होऊ शकतात.
त्यामुळे फळं खाताना ती फळं नैसर्गिक प्रकारे पिकवलेली असतील हे पहा आणि शरीराला त्रास होणार नाही याची काळजी घ्या.