Akshata Chhatre
उन्हाळ्याच्या गरम हवामानात काकडी ही एक नैसर्गिक थंडावा देणारी फळ-भाजी आहे. ती शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते.
काकडीत ९५ टक्के पाणी असतं. ती खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता भरून निघते आणि डिहायड्रेशनपासून बचाव होतो.
काकडी खाल्ल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि उष्णतेमुळे होणारे त्रास कमी होतात.
काकडीत फायबर भरपूर असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
काकडीतील अँटीऑक्सिडंट्स आणि पाण्यामुळे त्वचा ताजी, कोमल आणि तेजस्वी राहते.
काकडीत असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यात मदत करतात. काकडी खाणं म्हणजे लो-कॅलोरी, हाई-न्यूट्रिशन, त्यामुळे उन्हाळ्यात रोजच्या आहारात जरूर काकडीला समाविष्ट करा