Coconut Water: पावसाळ्यात नारळ पाणी अमृत की विष? जाणून घ्या 7 सुवर्ण नियम

Manish Jadhav

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेमुळे संसर्गाचा (Infections) धोका जास्त असतो. नारळ पाण्यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करुन पावसाळी आजारांपासून संरक्षण करतात.

Coconut water | Dainik Gomantak

नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सचा स्रोत

पावसाळ्यात अनेकदा डेंग्यू किंवा गॅस्ट्रोसारखे आजार पसरतात, ज्यामुळे शरीरातील प्लेटलेट्स आणि पाण्याचे प्रमाण कमी होते. नारळ पाण्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियमसारखे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवतात.

Coconut water | Dainik Gomantak

पचनक्रिया सुधारते

या ऋतूत पचनशक्ती मंदावते, ज्यामुळे गॅस, अपचन किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. नारळ पाणी पोटासाठी अत्यंत हलके आणि थंड असते. यातील फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास आणि पोट साफ ठेवण्यास मदत करते.

Coconut water | Dainik Gomantak

शरीराला हायड्रेट ठेवते

पावसाळ्यात उन्हाळ्यासारखी तहान लागत नाही, ज्यामुळे अनेक जण कमी पाणी पितात. परिणामी शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. रोज एक नारळ पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळते आणि मरगळ दूर होते.

Coconut water | Dainik Gomantak

त्वचा आणि केसांची काळजी

पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे (Humidity) त्वचेवर पिंपल्स आणि केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या वाढते. नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात, ज्यामुळे त्वचा डिटॉक्स होते आणि केसांना पोषण मिळते.

Coconut water | Dainik Gomantak

रक्तदाब नियंत्रित ठेवतो

नारळ पाण्यात असलेल्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. पावसाळ्यात तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते, अशा वेळी नारळ पाणी शरीरातील सोडियमची पातळी संतुलित राखते.

Coconut water | Dainik Gomantak

'या' गोष्टींची काळजी घ्या

नारळ पाणी पिणे उत्तम असले, तरी पावसाळ्यात ते नेहमी ताजेच प्यावे; जास्त वेळ काढून ठेवलेले पाणी पिणे टाळावे. तसेच, ज्यांना आधीच सर्दी, खोकला किंवा दमा आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा दुपारच्या वेळी नारळ पाणी प्यावे, कारण याची प्रकृती थंड असते.

Coconut water | Dainik Gomantak

Torna Fort: निसरडे खडक अन् कातळातील पायऱ्या...! ढगांच्या दुलईत हरवणाऱ्या तोरणाची मान्सून सफर बनते यादगार; ट्रेकर्सचं नंदनवन

आणखी बघा