Qasem Soleimani: कोण होते कासिम सुलेमानी

Manish Jadhav

इराण हादरले

इराणचे माजी जनरल कासिम सुलेमानी यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कबरीजवळ आयोजित कार्यक्रमाला लक्ष करुन बॉम्बस्फोट घडवून आणल्याने इराण हादरले.

Iran Bomb Blast | Dainik Gomantak

100 हून अधिक जण ठार

इराणमधील कामरान शहरात झालेल्या दहशतवादी स्फोटात 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर 150 जखमी झाले.

Iran Bomb Blast | Dainik Gomantak

कोण होते कासिम सुलेमानी

कासिम सुलेमानी हे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्समधील इराणचे मेजर जनरल होते. ते जवळपास 22 वर्षे इराणच्या कुद्स फोर्सचे कमांडर होते.

Former General Soleimani | Dainik Gomantak

अमेरिकन ड्रोन हल्ल्यात ठार

3 जानेवारी 2020 रोजी अमेरिकेने बगदाद, इराक येथे अमेरिकन ड्रोन हल्ल्यात सुलेमानी यांना ठार केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर ही कारवाई झाल्याचे मानले जाते.

Former General Soleimani | Dainik Gomantak

राष्ट्रीय नायक

कुद्स फोर्सचा कमांडर म्हणून आणि मोठ्या लष्करी कारवायांमध्ये त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना 'राष्ट्रीय नायक' म्हणून ओळखले गेले.

Former General Soleimani | Dainik Gomantak

इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या पाच शाखांपैकी कुद्स फोर्स ही मुख्य शाखा आहे. हे दल थेट देशाच्या सर्वोच्च नेत्याला अहवाल देते.

Former General Soleimani | Dainik Gomantak

सुलेमानी यांची लष्करी कारकीर्द

1980 च्या दशकात इराण-इराक युद्धाच्या सुरुवातीला सुलेमानी यांची लष्करी कारकीर्द सुरु झाली असे मानले जाते. त्यांनी इराणच्या लष्कराच्या 41 व्या तुकडीचेही नेतृत्व केले.

Former General Soleimani | Dainik Gomantak

हिजबुल्लाला पाठिंबा

सुलेमानी यांनी लेबनॉनच्या हिजबुल्लाला लष्करी पाठिंबा दिल्याचे मानले जाते. दरम्यान, इराणमधील हे हल्ले अशा वेळी झाले आहेत, जेव्हा लेबनॉनची राजधानी बेरुतमध्ये पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासचा उपप्रमुख मारला गेला आहे.

Former General Soleimani | Dainik Gomantak

इराकी सरकारच्या संयुक्त सैन्यालाही मदत

सुलेमानी यांनी शिया मिलिशिया आणि इराकी सरकारच्या संयुक्त सैन्यालाही मदत केली. ज्याने 2014-2015 मध्ये ISIS विरुद्ध युद्ध सुरु केले होते.

Former General Soleimani | Dainik Gomantak

अमेरिकेने दहशतवादी घोषित केले होते

शेकडो अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूसाठी अमेरिकेने कासिम सुलेमानी आणि कुद्स फोर्सला जबाबदार धरले होते. अमेरिकेने सुलेमानी यांना दहशतवादी घोषित करुन त्यांची हत्या केली.

Former General Soleimani | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी